मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी पक्षनेतेपदावरून हटवले !
पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप !
मुंबई – शिवसेनेत बंडखोरी करून ३९ समर्थक आमदारांसह बाहेर पडलेले शिवसेना पक्षनेते आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी १ जुलै या दिवशी पक्षनेतेपदावरून काढले आहे. यासंबंधीचे पत्र ठाकरे यांनी शिंदे यांना ३० जून या दिवशी पाठवले.
१. ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे की, तुम्ही (एकनाथ शिंदे) स्वत:हून शिवसेनेचे सदस्यत्व सोडले आहे. त्यामुळे आता पक्षप्रमुख या नात्याने मी तुम्हाला पक्षनेतेपदावरून काढत आहे. तुम्ही पक्षविरोधी कारवाया केल्यामुळेही हा निर्णय घेतला आहे.
२. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करतांना आपला पक्षच खरी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असल्याचा दावा केला होता. आपला पक्ष ‘शिवसेना बाळासाहेब’ म्हणून ओळखला जाईल, असेही शिंदे आणि अन्य बंडखोर आमदार यांनी घोषित केले होते.