दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाविषयी कुडचडे (गोवा) येथील श्री. संजय शिरसाट यांनी व्यक्त केलेले विचार
सनातन संस्थेचे पूज्य गुरुजी (परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले), संत, साधक आणि कार्यकर्ते यांना नतमस्तक होऊन सादर प्रणाम !
(दशम) अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला यंदा मी प्रथमच उपस्थित राहिलो. अधिवेशनात येण्यासाठी सनातन संस्थेचे उत्कृष्ट सहकार्य लाभले. विविध प्रांतांतील संत, साधक, राष्ट्रप्रेमी, राजकीय नेते, कायदेपंडित यांची अधिवेशनात झालेली मार्गदर्शने पुष्कळ प्रभावी वाटली. अधिवेशनात हिंदु म्हणजे काय ?, देवतांचे महत्त्व, तसेच ‘लव्ह जिहाद’, भूमी जिहाद, आमीष दाखवून बळजोरीने होत असलेल्या हिंदूंच्या धर्मांतराला एकसंघ होऊन कसा प्रतिकार करावा ? यांविषयी मिळालेले मार्गदर्शन थक्क करणारे होते. या अधिवेशनाला प्रत्येक हिंदूने उपस्थित रहाणे आवश्यक आहे. त्यामुळे राष्ट्रप्रेम आणि हिंदु धर्माला आलेली ग्लानी दूर होणार आहे. संपूर्ण अधिवेशनात संत, साधक आणि देशप्रेमी यांनी विविध घोषणा देऊन सभागृहाची ऊर्जा वाढवली. हिंदु अधिवेशनातील नियोजनबद्ध कार्य, सहकार्य, वागणे-बोलणे हे प्रेरणा देणारे आणि प्रत्येक भारतियाला अभिमान वाटणारे आहेत. परत एकदा माझा सर्वांना कोटी कोटी प्रणाम !
– श्री. संजय दिनकर शिरसाट, काकोडा, कुडचडे, गोवा.