कराची (पाकिस्तान) येथे ‘सॅमसंग’ने केलेल्या पैगंबरांच्या कथित अवमानाच्या प्रकरणी मॉलमध्ये तोडफोड
कराची (पाकिस्तान) – ‘सॅमसंग’ आस्थापनाकडून झालेल्या पैगंबर यांच्या कथित अवमानाच्या प्रकरणी येथील ‘स्टार सिटी मॉल’मध्ये मुसलमानांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. पोलिसांनी अवमानाच्या प्रकरणी ‘सॅमसंग’च्या २७ कर्मचार्यांना अटक केली आहे.
मुसलमानों की भीड़ कंपनी के एक बिलबोर्ड पर बने क्यूआर कोड से हो गई नाराज, कर दिया हमला #Blasphemyhttps://t.co/C5iVQguuiW
— Zee News (@ZeeNews) July 1, 2022
या प्रकरणी या आस्थापनाने क्षमा मागितली आहे. हिंसाचार करणारे ‘तहरीक ए लब्बैक पाकिस्तान’ या जिहादी संघटनेचे सदस्य असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘सॅमसंग’ने जारी केलेल्या भ्रमणभाषच्या क्युआर कोडमध्ये पैगंबर यांचा अवमान झाल्याचा दावा मुसलमानांकडून करण्यात आला होता.
संपादकीय भूमिकामुसलमान कुठेही असले, तरी ते त्यांच्या श्रद्धास्थानांचा कथित अवमान झाला, तरी कायदा हातात घेतात, तर हिंदू त्यांच्या श्रद्धास्थानांचा खरोखर अवमान करण्यात आला, तर वैध मार्गानेही विरोध करत नाहीत ! |