अमरावती येथील वैद्यकीय व्यावसायिकाच्या निर्घृण हत्येप्रकरणी ६ धर्मांधांना अटक !
नूपुर शर्मा यांचे समर्थन केल्याने हत्या झाल्याचे पोलीस अन्वेषणात उघड !
अमरावती – येथील वैद्यकीय व्यावसायिक उमेश कोल्हे (वय ५५ वर्षे) यांची २१ जूनच्या रात्री ११ वाजण्याच्या सुमारास येथील न्यू हायस्कूलसमोर गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी अतिफ रशीद आदिल रशीद, मुदस्सीर अहमद शेख इब्राहिम, शाहरूख पठाण हिदायत खान, अब्दुल तौफिक उपाख्य नानू शेख तसलिम आणि शोएब खान उपाख्य भुर्या वल्द साबीर खान यांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी २ जुलैच्या पहाटे डॉ. युसूफ खान बहादूर खान यास अटक केली आहे. कोल्हे यांच्या कुटुंबियांनी डॉ. युसूफ खान यांच्यावर हत्येविषयी प्रथम संशय व्यक्त केला होता.
उमेश कोल्हे २१ जूनच्या रात्री दुकान बंद करून निघाल्यावर वाटेत ३ धर्मांधांनी त्यांच्यावर चाकूने आक्रमण केले. त्यांना खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले; पण उपचाराच्या वेळी त्यांचे निधन झाले.
या प्रकरणी पोलिसांनी ३ मारेकर्यांविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.
नूपुर शर्मा के समर्थन पर अमरावती में टारगेट किलिंग: उदयपुर से 740 KM दूर कन्हैया जैसी वारदात, सीसीटीवी फुटेज में दिखे आरोपीhttps://t.co/NhwzqPNDWR#Maharashtra #Amaravati #UdaipurTerrorAttack #NupurSharma pic.twitter.com/Lq99N6kgo5
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) July 2, 2022
नुपूर शर्मा यांच्या पोस्ट (लिखाण) प्रसारित केल्यानेच कोल्हे यांची हत्या ! – विक्रम साळी, पोलीस उपायुक्त
सामाजिक माध्यमांवर नूपुर शर्मा यांच्या काही पोस्ट प्रसारित केल्यानेच कोल्हे यांची हत्या झाली आहे, असे प्रथमदर्शी अन्वेषणात उघड झाले आहे, अशी माहिती अमरावतीचे पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी दिली.
#WATCH Umesh Kolhe murder case | A total of six accused have been arrested so far from Amravati. During the investigation, we found that Umesh Kolhe had posted on social media in support of Nupur Sharma and this incident took place because of that post: Vikram Sali, DCP Amravati pic.twitter.com/0XRnfWjWXS
— ANI (@ANI) July 2, 2022
खासदार नवनीत राणा यांचे केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र !
खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एक पत्र पाठवले आहे.
Navneet Rana writes to HM Amit Shah, seeks action against Amravati CP for 'cover-up' https://t.co/pq4B08FXz3
— Republic (@republic) July 2, 2022
त्यात त्यांनी ‘कोल्हे यांची हत्या म्हणजे शहरातील पोलीस आयुक्त आरती सिंह यांचे अपयश असून त्यांना पदावरून हटवण्यात यावे’, अशी मागणी केली आहे.
6 people arrested so far,sent to Police custody. They’ve been booked under IPC sec 302 (murder), 120 B (criminal conspiracy), 34: Vikram Sali, DCP Amravati on Amravati murder
“Prima facie it seems to be the case,” he says on if the reason is his social media post on Nupur Sharma
— ANI (@ANI) July 2, 2022
स्थानिक पोलीस, एन्.आय.ए आणि ए.टी.एस्. पथकांद्वारे अन्वेषण चालू !
‘आतंकवादविरोधी पथक (ए.टी.एस्.) या प्रकरणाचे अन्वेषण करत आहे’, अशी माहिती पथकाच्या वरिष्ठ अधिकार्याने दिली आहे. या प्रकरणाचा आतंकवाद्यांशी काही संबंध आहे का ? याचेही अन्वेषण केले जात आहे. या एकाच प्रकरणाचे स्थानिक पोलीस, राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए.) आणि ए.टी.एस्. पथकांद्वारे करण्यात येत आहे. (एका हत्या प्रकरणाच्या अन्वेषणासाठी ३ पोलीस यंत्रणा कशाला ? एका अन्वेषण यंत्रणेवर सरकारचा विश्वास नाही का ? एकच अन्वेषण यंत्रणा ठेवून उर्वरित अन्वेषण यंत्रणांनी इतर प्रकरणांचे अन्वेषण केले, तर तो वेळ सार्थकी ठरेल ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|