केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहात जाऊन दर्शन घेण्यास अनुमती !
उत्तराखंड सरकारचा निर्णय
डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंड राज्यातील भाजप सरकारने केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्यावरील निर्बंध हटवले आहेत. आता यात्रेकरू गर्भगृहात जाऊन दर्शन घेऊ शकतात. याच वर्षी मे आणि जून मासामध्ये मोठ्या संख्येने यात्रेकरू आल्याने गर्भगृहातील प्रवेशावर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे भाविक सभामंडपातूनच दर्शन घेत होते. आता भाविकांची संख्या अल्प झाल्याने ही बंदी उठवण्यात आली आहे. प्रतिवर्षी लाखो भाविक केदारनाथ मंदिरात दर्शनासाठी येत असतात. येथे पहाटे ५ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत दर्शन चालू असते.
केदारनाथ के गर्भगृह में जाकर अब दर्शन कर सकेंगे श्रद्धालु, धामी सरकार ने हटाया प्रतिबंध: दर्शनार्थियों की संख्या ने पिछला रिकॉर्ड तोड़ा#KedarnathTemple #Kedarnathhttps://t.co/baLQsXGu1N
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 2, 2022
संपादकीय भूमिकामंदिराच्या गर्भगृहातील प्रवेशाविषयीचा निर्णय धर्माचार्यांनी आणि तेथील पुजार्यांनी घेणे अपेक्षित आहे. गर्भगृहाला वेगळे आध्यात्मिक महत्त्व आहे. तेथील पावित्र्य जपणे आवश्यक असते. देशातील सर्व मोठ्या मंदिरांमध्ये याचे पालन केले जाते. त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय शासनकर्त्यांनी घेणे योग्य नाही ! |