पिस्तुल बाळगल्याच्या प्रकरणी आरोपीची २६ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता !
मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – येथे २ नोव्हेंबर १९९६ या दिवशी अवैधरित्या पिस्तुल बाळगल्याच्या प्रकरणी अटक केलेल्या एका व्यक्तीची २६ वर्षांनंतर पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. अटकेनंतर या व्यक्तीला ३ मासांनंतर जामीन मिळाला होता. रामरतन असे या व्यक्तीचे नाव असून आता तिचे वय ७० वर्षे आहे. या प्रकरणामुळे रामरतन यांची आर्थिक स्थिती वाईट झाली. दोन मुलींचे शिक्षण होऊ शकले नाही. याविषयी रामरतन यांनी सरकारकडे आर्थिक साहाय्य करण्याची मागणी करण्यासह त्यांना खोट्या प्रकरणात अटक करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. (मुळात अशी मागणी का करावी लागते ? सरकारने स्वतःहून याची नोंद घेऊन संबंधितांवर कारवाई करून हानी भरपाई दिली पाहिजे. अशा प्रकरणांत सरकारने कायदाच करून आर्थिक हानी देण्याची सोय केली पाहिजे ! – संपादक)
संपादकीय भूमिकानिर्दोषांना अटक करून त्यांच्या आयुष्याची हानी करणार्यांना शिक्षा झाली पाहिजे ! |