गोमंतकियांच्या रक्षणासाठी कट्टरपंथी आणि घुसखोर यांच्यावर त्वरित कारवाई करावी ! – हिंदु रक्षा महाआघाडी
पणजी, १ जुलै (प्रसिद्धीपत्रक) – राजस्थानमधील उदयपूर येथील कन्हैयालाल या सामान्य हिंदूची त्याच्या शिवणकामाच्या दुकानात घुसून दोन कट्टरतावादी जिहाद्यांनी नृशंस हत्या केली. त्यानंतर या दोघा जिहाद्यांनी स्वत:चा व्हिडिओ बनवून हसत हसत हत्येची स्वीकृती तर दिलीच; मात्र ती देतांना त्यांनी देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी, तसेच नूपुर शर्मा यांनाही धमकीही दिली. अशाच प्रकारे महाराष्ट्रातील अमरावती येथेही एका औषधांच्या दुकानाचे मालक उमेश कोल्हे यांचीही काही कट्टरतावादी जिहाद्यांनी हत्या केली. या घटनांचा हिंदु रक्षा महाआघाडीने पणजी येथे पत्रकार परिषद घेऊन तीव्र निषेध करतांना गोमंतकियांच्या रक्षणासाठी कट्टरपंथी आणि घुसखोर यांच्यावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
या वेळी हिंदु रक्षा महाआघाडीचे निमंत्रक श्री. सुभाष वेलिंगकर म्हणाले, ‘‘यापूर्वी सीरिया, अफगाणिस्तान येथे इस्लामिक स्टेटकडून केल्या जाणार्या हत्या आता भारतातही चालू झाल्या आहेत. या स्थितीत सध्या गोव्यातही कट्टरपंथी संघटनांचा प्रभाव वाढू लागला आहे. प्रत्येक वर्षी गोव्यात ६ डिसेंबरच्या काळात गोव्यात ‘बाबरी मशिदी’चे फलक लावून भावना भडकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापूर्वीही इंडियन मुजाहिदीनचा प्रमुख यासीन भटकळ गोव्यात १ वर्ष राहून गेला होता, तसेच मुंबई आतंकवादी आक्रमणातील आरोपी डेव्हिड हेडली याने गोव्यात येऊन २ गावांतील ज्यू पंथियांच्या छाबड हाऊसची रेकी केली होती.
विदेशी पर्यटकांमुळे गोव्याला सातत्याने आतंकवाद्यांनी लक्ष्य बनवण्याची शक्यता वर्तवली जाते. आज गोव्यात रोजगारासाठी येणार्यांत अवैध बांगलादेशींचा, तसेच रोहिंग्यांचाही समावेश असू शकतो. यांतूनच कट्टरपंथियांचाही प्रवेश गोव्यात होऊ शकतो. गोमंतकातील शांत आणि संयमी नागरिकांना उद्या कन्हैयालालप्रमाणे एखाद्या क्रूर घटनेला सामोरे जावे लागू नये, यासाठी गोव्यातील सरकारने या संदर्भात सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलणे आवश्यक आहे.’’
गोवा सरकारने राज्यात कट्टरपंथी संशयितांची माहिती देण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एका विभागाची स्थापना करावी ! – रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती
हिंदु रक्षा महाआघाडीच्या वतीने हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे म्हणाले, ‘‘नूपुर शर्मा यांच्या विषयावर अनेक चिथावणी देणारी वक्तव्ये देशभरात झाली आहेत. मुसलमान युवकांची माथी भडकावून त्यांचा ब्रेनवॉश करणारे मौलवी तथा कट्टरतावादी मुसलमान संघटना याही तितक्याच दोषी आहेत. ‘आतंकवादाचा प्रारंभ मदरशांच्या मानसिकतेतून चालू होतो’, असे केरळचे मा. राज्यपाल महंमद आरिफ यांनीही म्हटले आहे. या दृष्टीने आम्ही गोवा सरकारकडे मागणी करतो की, हिंदूंच्या हत्यांमागे कोणते षड्यंत्र आहे, याचा छडा केंद्रशासनाद्वारे लावावा. हत्या करणार्यांना पैसा पुरवणारे, त्यांना आश्रय आणि प्रशिक्षण देणारे या सर्वांची चौकशी करून त्यांची पाळेमुळे खणून काढावीत, तसेच दोषींना फाशीची शिक्षा द्यावी. यांसह सरकारने मदरशांना निधी देणे बंद करावे आणि आतंकवादाचे प्रशिक्षण देणारे मदरसे त्वरित बंद करावेत. गोव्यातही सरकारने अशा अवैध घुसखोरांची, तसेच कट्टरपंथी संशयितांची माहिती देण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एका विभागाची स्थापना करावी.’’
हे पण पहा –
विशेष संवाद : भारत में बढती तालिबानी मानसिकता !
#उदयपुर #HinduLivesMatters
विशेष संवाद : भारत में बढती तालिबानी मानसिकता ! #उदयपुर #HinduLivesMatters https://t.co/ncr9gRnQwS
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) June 29, 2022
या पत्रकार परिषदेला हिंदु रक्षा महाआघाडीचे सहनिमंत्रक श्री. संदीप पाळणी, गोमंतक मंदिर महासंघाचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत (भाई) पंडित, राष्ट्रीय बजरंग दलाचे गोवा अध्यक्ष श्री. नितीन फळदेसाई, श्री. सुरेश डिचोलकर, श्री. श्रीगणेश गावडे आणि सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत यांची उपस्थिती होती.