उदयपूर, राजस्थान येथील ‘कन्हैयालाल’ यांची हत्या करणार्यांना फाशीची शिक्षा द्या !
हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने मुरगाव तालुक्याच्या उपजिल्हाधिकार्यांकडे मागणी
वास्को, १ जुलै – उदयपूर, राजस्थान येथील ‘कन्हैयालाल’, तसेच अमरावती, महाराष्ट्र येथील ‘उमेश कोल्हे’ या हिंदूंच्या हत्या करणार्यांना फाशी, तसेच त्यांना साहाय्य करणार्या सर्वांवर कठोर कारवाई करण्याची मागणी हिंदु जनजागृती समिती आणि इतर हिंदुत्वनिष्ठ यांनी मुरगाव तालुक्याच्या उपजिल्हाधिकार्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन देतांना शिष्टमंडळामध्ये सर्वश्री प्रवीण चौधरी, बी.एस्. नेगी, एस्.एन्. खुशवाह, होतीलाल, अभय कुमार, नागेश उंडेकर, सावळो मडगावकर, प्रभाकर आजगावकर, अजय मयेकर, सौ. रंजना, सौ. पुष्पा आणि सौ. वैदेही भोवर यांचा समावेश होता.
या निवेदनात म्हटले आहे की,
नूपुर शर्मा यांचे समर्थन केले, म्हणून राजस्थानमधील उदयपूर येथे शिवणकाम करणार्या कन्हैयालाल या सामान्य हिंदूची त्याच्या दुकानात घुसून २ कट्टरवादी जिहाद्यांनी नृशंस हत्या केली. त्यानंतर या दोघा जिहाद्यांनी स्वत:चा व्हिडिओ बनवून हत्येची स्वीकृती तर दिलीच; मात्र ती देतांना त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि नूपुर शर्मा यांचे समर्थन करणार्या अनेकांना धमकीही दिली आहे. ही सर्वसामान्य घटना नसून देशाच्या सार्वभौमत्वासह येथील सभ्य समाज, राज्यघटना आणि लोकशाही यांवर केलेले आक्रमणच आहे. अशाच प्रकारे ४-५ दिवस आधी महाराष्ट्रातील अमरावती येथेही एका औषधांच्या दुकानाचे मालक उमेश कोल्हे यांचीही काही कट्टरवादी जिहाद्यांनी हत्या केली. केंद्रशासनाने हिंदूच्या हत्यांमागे कोणते षड्यंत्र आहे, याचा छडा लावावा. केवळ हत्येतील दोषींचा शोध न घेता हत्या करणार्यांना पैसा पुरवणारे, त्यांना आश्रय आणि प्रशिक्षण देणारे या सर्वांची चौकशी करून त्यांची पाळेमुळे खणून काढावीत. तसेच दोषींना फाशी द्यावी. यांसह सरकारने मदरशांना निधी देणे बंद करावे आणि आतंकवादाचे प्रशिक्षण देणारे मदरसे त्वरित बंद करावेत. या निवेदनाच्या प्रती उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकार्यांना देण्यात येणार आहेत.