अभ्यासवर्ग किंवा सत्संग यांमध्ये तसेच नामजप करतांना आरंभी भावप्रयोग केल्यास भावजागृती होण्यास साहाय्य होणे !
सप्टेंबर २०१६ मध्ये देहली आणि वाराणसी सेवाकेंद्र येथे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी व्यष्टी साधनेचा आढावा घेतला. त्या वेळी त्यांनी आढाव्याच्या आधी सर्वांकडून भावजागृतीचा एक प्रयोग करवून घेतला. ‘धन्य धन्य हम हो गये गुरुदेव । आपने हमे जो अपना लिया । आपकी कृपा से जो भिगो दिया, धन्य धन्य हम हो गये गुरुदेव ।’ या ओळी प्रत्येक साधकाला मनातल्या मनात २ वेळा म्हणायला सांगितल्या. त्यानंतर सगळ्यांना सामूहिकरित्या या २ ओळी म्हणायला सांगितल्या आणि दोन्ही वेळेस काय जाणवले, ते सांगायला सांगितले. त्यामुळे सर्वांचा भाव जागृत झाला आणि चांगल्या अनुभूतीही आल्या. त्या दिवशी व्यष्टी साधनेचा आढावाही भावाच्या स्तरावर झाला. असा प्रयोग सलग ३ दिवस केला. त्यामुळे साधकांच्या उत्साहात वाढ झाली. साधकांना आलेल्या अनुभूती पुढे देत आहोत.
अशा प्रकारे भावाचे अन्य प्रयोग करून सातत्य ठेवल्यास लाभ होईल. असे भावाचे प्रयोग अभ्यासवर्ग, सत्संग, नामजप करतांना आरंभी केले, तर सर्वांचाही भाव जागृत होईल आणि सेवाही भावपूर्ण होईल.
१. मनातल्या मनात भावप्रयोग करतांना सहजपणा नव्हता. लक्ष केवळ भजनावरच होते. सामूहिकरित्या भजन म्हणतांना सहजपणा होता. मन शांत आणि स्थिर होते अन् संघटितपणा वाटत होता.
– कु. मनीषा माहूर
२. मनातल्या मनात भावप्रयोग करतांना शरिराला कंप येत होता आणि आत्मविश्वास न्यून वाटत होता. सामूहिकरित्या भावप्रयोग करतांना शब्द अंतर्मनातून येत होते आणि शरणागतभाव वाटत होता.
– सौ. केतकी येळेगावकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |