भावसूचना
भावजागृतीचे प्रयत्न करतांना प्रारंभी प्रत्येक कृतीला भाव जोडायचा आहे, हे सातत्याने लक्षात रहात नाही. यासाठी सूचना द्यायला हवी. रामनाथी आश्रमातील सौ. स्वाती शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांनी सांगितलेली भावसूचना पुढे दिली आहे.
‘प्रत्येक कृती भावाला जोडून भावपूर्ण केल्यावरच माझ्यातील ‘मी’चे, म्हणजे अहंचे प्रमाण न्यून होऊन माझा भाव वाढणार आहे. त्यामुळे मला ईश्वराचे अस्तित्व जाणवणार आहे’, हे लक्षात घेऊन मी प्रत्येक कृतीला भाव जोडून ती भावपूर्ण करीन.’