अल्पवयीन मुलाच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणी मदरशाच्या शिक्षकाला ६७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
पेरुंबवूर (केरळ) – केरळच्या पेरुंबवूर येथील मदरसा शिक्षक अलियार याला ११ वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी ‘पॉक्सो’ न्यायालयाने दोषी ठरवले. अलियारला एकूण ६७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. यासह त्याला ६५ सहस्र रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला.
अलियारने मदरशाच्या एका खोलीत मुलावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केले. त्याने मुलाला भ्रमणभाष देऊन अश्लील व्हिडिओ पहाण्यास भाग पाडले. याविषयी कुणाकडे तक्रार केल्यास परीक्षेत नापास करण्याची धमकीही त्याने पीडित विद्यार्थ्याला दिली. याविषयी मुलाने त्याच्या मित्रांना सांगितले. मित्रांनी शिक्षकाच्या विरोधात प्राचार्यांकडे तक्रार केली. त्यानंतर आरोपी शिक्षकाच्या विरोधात पोलीस आणि बाल कल्याण समितीकडे तक्रार करण्यात आली. १९ जानेवारी २०२० या दिवशी अलियारला ‘पॉक्सो’ कायद्याखाली अटक करण्यात आली होती.