समष्टी भाव वाढवण्यासाठी करावयाचे प्रयत्न !
प्रत्येक कर्म ईश्वरासाठी करत आहे, तसेच ईश्वराचे कार्यही माझेच आहे, या प्रकारचा भाव आणि त्यातून ईश्वरेच्छेने घडणाऱ्या कृतीला ‘समष्टी भाव’ म्हणतात. ‘सर्व जीव ईश्वराजवळ जावेत’, असा भाव म्हणजे समष्टी भाव. साधनेमध्ये समष्टी साधनेला ७० टक्के महत्त्व आहे. समष्टी साधना करण्यासाठी समष्टी भाव येण्यासाठी करावयाचे प्रयत्न पुढे दिले आहेत.
१. व्यष्टी साधना परिपूर्ण करणे
२. ‘व्यष्टी साधना होण्यासाठी समष्टीत जाऊन सेवा करतो’, हा भाव ठेवणे
३. ‘समष्टी भाव वाढवणे हा ईश्वरप्राप्तीचा घटक आहे’, हा भाव ठेवून प्रत्येक कृती करणे
४. स्वतः प्रत्येक क्षणाचा साधनेसाठी वापर करून तसा इतरांनाही करायला लावणे
५. सातत्याने इतरांचा विचार करणे
६. इतरांकडून झालेल्या चुका स्वत:च्या समजून त्या सुधारण्याचा आणि इतरांमध्ये ईश्वरी गुण आणण्याचा प्रयत्न करणे
– श्रीकृष्ण (सौ. प्रार्थना बुवा पूर्वाश्रमीच्या कु. मेघा नकाते यांच्या माध्यमातून, ७.७.२००५)
(संदर्भ : सनातननिर्मित ग्रंथ – भावजागृतीसाठी साधना खंड १)