राज महंमद याचे लेबनॉन आणि सीरिया येथील इस्लामी आतंकवाद्यांशी संबंध !
रा.स्व. संघाची कार्यालये उडवण्याची धमकी देण्याचे प्रकरण
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – ज्ञानवापी आणि हिजाब (मुसलमान महिलांचे डोके आणि मान झाकण्याचे वस्त्र) यांवरून विवाद चालू होता. यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ६ कार्यालये बाँबद्वारे उडवून देण्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेला राज महंमद याचे लेबनॉन अन् सीरिया येथील इस्लामी आतंकवाद्यांशी संबंध होते, अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे. राज महंमद याच्या ‘व्हॉट्सअॅप चॅट’ आणि अन्य माहितीद्वारे हे उघडकीस आले आहे. राज महंमद याला ७ जून या दिवशी तमिळनाडू येथून अटक करण्यात आली होती.
१. उत्तरप्रदेश आतंकवादी पथकाकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. या पथकाच्या अधिकार्यांनी सांगितले की, २० वर्षीय राज महंमद जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श असणार्या डॉ. झाकीर नाईक याच्या विचाराने प्रेरित होता. त्याचा जिहादी आतंकवाद्यांशी ऑनलाइन संपक होता.
२. या पथकाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक नवीन अरोरा यांनी सांगितले की, राज महंमद एक कट्टरतावादी तरुण आहे. तो सातत्याने जिहाद संदर्भातील साहित्य वाचतो आणि त्याचे पालन करतो. ज्ञानवापीच्या प्रकरणी, तसेच कर्नाटकमध्ये चालू असलेल्या हिजाब प्रकरणामुळे त्याने संघाची कार्यालये उडवण्याची धमकी दिली होती.
३. आतंकवादविरोधी पथकाच्या एका अधिकार्याने सांगितले की, तो स्वतःला प्रेषित समजतो आणि जगातील वाईट अन् अन्याय यांना दूर करण्याविषयी बोलत असतो.
४. राज महंमद याने संघाची लक्ष्मणपुरी येथील २, तर कर्नाटकातील ४ कार्यालये उडवण्याची धमकी दिली होती. व्हॉट्स अॅप गटांमध्ये कन्नड, इंग्रजी आणि हिंदी भाषांत ही धमकी देण्यात आली होती.
संपादकीय भूमिका
|