धाराशिव नामांतराच्या निर्णयाचा निषेध
धाराशिव येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३० पदाधिकार्यांचे सामूहिक त्यागपत्र !
धाराशिव – अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला ‘उस्मानाबाद’ शहराचे पूर्ववत् ‘धाराशिव’ असे नामकरण करण्याचा निर्णय २९ जून या दिवशी मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला; मात्र या निर्णयाच्या निषेधार्थ धाराशिव येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३० पदाधिकार्यांनी पक्षाकडे सामूहिक त्यागपत्र दिले आहे.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आयाज शेख म्हणाले, ‘‘धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंत्र्यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत नामांतराच्या प्रस्तावास विरोध न केल्याने आम्ही पक्षाकडे सामूहिक त्यागपत्र देत आहोत.’’