त्र्यंबकेश्वर (जिल्हा नाशिक) येथील मंदिरातील शिवपिंडीवर जमा झाला बर्फ !
ईशान्य भारतात संकट आल्यानंतर असा चमत्कार घडतो ! – पुजार्यांची दावा
नाशिक – १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या येथील त्र्यंबकेश्वर मंदिरातील श्री शंकराच्या पिंडीवर बर्फ जमा झाला आहे, असे पुजार्यांनी सांगितले. सध्या आसाममध्ये महापूर आला आहे. ईशान्य भारतात संकट आल्यानंतर असा चमत्कार घडतो, असा दावा पुजार्यांनी केला आहे.
तब्ब्ल ६० वर्षानंतर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील अजब प्रकार, PHOTOS पाहून थक्क व्हालhttps://t.co/7olVuYvxHv
— Maharashtra Times (@mataonline) July 1, 2022
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात संत निवृत्तीनाथ मंदिर, कुशावर्त तीर्थ, ब्रह्मगिरी आदी स्थळी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी असते. येथे अनेक भाविक पूजाविधीसाठी येतात. या मंदिरात मुख्य पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा व्हिडिओ समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. ‘सीसीटीव्ही’चे चित्रण पडताळून त्या पिडींवर खरेच बर्फाचा गोळा सिद्ध झाला आहे ? कि या पाठीमागे दुसरे काही कारण आहे ?, हे शासकीय अधिकारी पडताळत आहेत. ‘सीसीटीव्ही’चे चित्रण समोर आल्यानंतरही याविषयीची माहिती समजू शकणार आहे.
वर्ष १९६२ मध्ये भारत-चीन युद्धाच्या वेळीही शिवपिंडीवर जमा झाला होता बर्फ !
यापूर्वी वर्ष १९६२ मध्ये भारत-चीन युद्धाच्या वेळी असा बर्फ शिवपिंडीवर जमा झाल्याचे सांगण्यात आले.