त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थपर्वातील पहिले राजयोगी स्नान २ ऑगस्ट २०२७ या दिवशी होणार !
|
त्र्यंबकेश्वर (जिल्हा नाशिक) – त्र्यंबकेश्वर येथे वर्ष २०२७ मध्ये होणार्या सिंहस्थ कुंभपर्वातील पहिले राजयोगी स्नान (शाहीस्नान) २ ऑगस्ट २०२७ या दिवशी होणार आहे. पुरोहित संघाने तिन्ही राजयोगी स्नानांचे दिनांक निश्चित करून ते ३० जून या दिवशी महंत सागरानंद सरस्वती महाराज आणि अखिल भारतीय षड्दर्शन आखाडा परिषदेचे महामंत्री तथा श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे मुख्य संरक्षक हरिगिरी महाराज यांच्याकडे पुढील नियोजनासाठी सादर केले.
Nashik News : ठरलं! त्र्यंबकेश्वर आगामी सिंहस्थ कुंभमेळा पर्वणी तारखा जाहीर, ‘या’ दिवशी पहिलं शाही स्नानhttps://t.co/BYlOmBsm4Z#Nashik #NashikNews
— ABP माझा (@abpmajhatv) June 30, 2022
श्री पंचशंभू दशनाम जुना आखाडा येथे हरिगिरी महाराज यांच्या उपस्थितीत जुना आखाड्यातील साधू-महंत यांची बैठक झाली. या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. आषाढ शुद्ध प्रतिपदा आणि गुरुपुष्यामृत योग यांचे औचित्य साधून महामंत्री हरिगिरी, महामंडलेश्वर शिवगिरी, श्री पंचायती आनंद आखाड्याचे गणेशानंद सरस्वती, जुना आखाड्याचे विष्णुगिरी, नीळकंठगिरी, इच्छागिरी आणि साध्वी शैलजामाता यांनी सकाळी यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थ येथे स्नान करून श्री महादेवाचे दर्शन घेतले, तसेच अभिषेक आणि पूजा केली. कुशावर्त तीर्थ येथे झालेल्या कार्यक्रमात पुरोहित संघाचे त्रिविक्रम जोशी आणि प्रमोद जोशी यांनी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर अन् उपनगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार यांच्या उपस्थितीत आगामी सिंहस्थपर्वाचे दिनांक पुढील नियोजनासाठी सादर केले.
सिंहस्थपर्वातील महत्त्वाचे दिनांक !सिंहस्थ ध्वजारोहण : ३१ ऑक्टोबर २०२६ |