कन्हैयालाल यांच्या समर्थनार्थ कर्नाटकातील हिंदूंचे आंदोलन
म्हैसुरू (कर्नाटक) – उदयपूर, राजस्थान येथील कन्हैयालाल तेली यांच्या हत्येच्या निषेधार्थ कर्नाटकातील हिंदु दुकानदारांनी ३० जून या दिवशी म्हैसुरू येथे आंदोलन केले. या वेळी त्यांनी हातात फलकही धरले होते.
‘I am a Hindu… I won’t speak the truth, don’t kill us’: Hindu vendors in Karnataka hold poster campaign to show solidarity with Kanhaiya Lalhttps://t.co/vexsC47npL
— OpIndia.com (@OpIndia_com) July 1, 2022
कन्हैयालाल तेली यांच्या मुलाने नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ सामाजिक माध्यमावर पोस्ट प्रसारित केल्यानंतर जिहादी आतंकवाद्यांनी कन्हैयालाल यांची हत्या केली. या हत्येनंतर देशाच्या विविध भागात कन्हैयालाल यांच्या समर्थनार्थ हिंदूंनी मोर्चे काढले.