(म्हणे) भारतात अल्पसंख्यांकांच्या सामूहिक नरसंहाराचा धोका !
अमेरिकेचे धार्मिक स्वातंत्र्याविषयीचे राजदूत रशद हुसेन यांचा कथित दावा
वॉशिंग्टन (अमेरिका) – भारतामध्ये धार्मिक अल्पसंख्यांकांचे अधिकार संकटात आहेत. अल्पसंख्यांकांच्या सामूहिक नरसंहाराचा धोका आहे, असे विधान अमेरिकेचे धार्मिक स्वातंत्र्याविषयीचे राजदूत रशद हुसेन यांनी अमेरिकेच्या एका समितीसमोर बोलतांना केले. हुसेन हे मूळचे भारतीय वंशाचे आहेत.
The US ambassador at large for international religious freedom Rashad Hussain warned that an early warning project ranked the risk of mass killings in India as the second highest in the world.
(reports @prashantktm) https://t.co/kK2hBkadss
— Hindustan Times (@htTweets) June 30, 2022
हुसेन पुढे म्हणाले की, आम्ही भारतात चर्चवरील आक्रमणे, तसेच हिजाबवरील बंदी यांसारख्या घटना पाहिल्या आहेत. एका मंत्र्याने तर असे म्हटले की, भारतामध्ये मुसलमान, म्हणजे वाळवी आहे. मुसलमान, ख्रिस्ती, शीख, दलित, आदिवासी आदींच्या अधिकारांचे भारतात रक्षण झाले पाहिजे. भारत एक सर्वांत मोठा लोकशाहीप्रधान देश आहे. तेथे अमेरिकेप्रमाणे समान भागीदारी निश्चित व्हावी, असे अमेरिकेला वाटते.
संपादकीय भूमिका
|