अल्पवयीन मुलीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याने आरोपीला १ वर्षाची शिक्षा !
वर्ष २०१५ मधील घटनेचा वर्ष २०२२ मध्ये निकाल !
मुंबई – येथे वर्ष २०१५ मध्ये इयत्ता ८ वीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीला ‘आय लव्ह यू’ असे म्हणणार्या ३० वर्षीय तरुणाला न्यायालयाने १ वर्ष सश्रम कारावास आणि १० सहस्र रुपयांची शिक्षा सुनावली. तो जवळपास १५ दिवस या मुलीचा पाठलाग करून तिला त्रास देत होता.तो या मुलीच्या घराच्या जवळच रहाणारी आहे. घटनेनंतर तो पळून गेला होता. मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार प्रविष्ट केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. ‘पीडितेचे वडील नशेमध्ये गोंधळ घाततात आणि त्यांची तक्रार केल्याने मला फसवण्यात आले’, असा दावा आरोपीने केला होता. यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोचले होते. न्यायालयाने त्याला जामीन संमत केला होता. मुलीच्या आईने दिलेल्या साक्षीच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत शिक्षा सुनावली.
संपादकीय भूमिकाविलंबाने मिळणारा न्याय, हा अन्यायच आहे, असेच जनतेला वाटेल ! |