८ मंत्र्यांच्या विरोधातील याचिकेवर सुनावणीसाठी १ लाख रुपये जमा करा ! – उच्च न्यायालय
मुंबई – शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह आठ मंत्र्यांविरोधात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी हवी असल्यास अगोदर १ लाख रुपये जमा करावेत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिले आहेत. ही याचिका सकृतदर्शनी राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे दिसून येते, अशी टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे.
वैयक्तिक लाभासाठी या ८ मंत्र्यांनी बंडखोरी करून त्यांच्या घटनात्मक कर्तव्याचा भंग केला आहे. तसेच चांगल्या प्रशासनामध्ये अडथळा आणला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर कारवाईचे आदेश देण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे. तसेच त्यांचा गौहत्तीपर्यंतचा प्रवास आणि तेथील वास्तव्य यांचा व्यय यांविषयी चौकशीची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.