(म्हणे) ‘आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दायित्व पार पाडण्यात भारतीय अधिकारी अपयशी !’
उदयपूर येथील कन्हैयालाल यांच्या हत्येचे प्रकरण
नवी देहली – उदयपूरमधील हत्येच्या घटनेतून ‘भेदभाव आणि सुनियोजित हिंसा यांपासून सर्वांचे रक्षण, तसेच पीडितांना त्वरित न्याय मिळवून देण्यासाठीचे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दायित्व पार पाडण्यात भारतीय अधिकारी अपयशी ठरले आहेत’, असे विधान भारतात बंदी असलेल्या ‘अॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ या कथित मानवाधिकार संघटनेचे नेते आकार पटेल यांनी केले.
उदयपूर येथे कन्हैयालाल या हिंदूच्या शिरच्छेदाच्या घटनेचा भारतात बंदी असलेल्या ‘अॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ या कथित मानवाधिकार संघटनेने निषेध करत भारताला उपदेशाचे डोस पाजले आहेत. ‘द्वेषातून गुन्हे करणार्यांना कोणत्याही प्रकारची सूट मिळता कामा नये. लोकांवरील आक्रमण होण्याआधीच तात्काळ उपाययोजना काढल्या गेल्या पाहिजेत, असेही पटेल म्हणाले.
संपादकीय भूमिकाकाश्मीरमध्ये फोफावलेल्या जिहादी आतंकवादाचे समर्थन करणार्या ‘अॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ या बंदी घातलेल्या भारतद्वेषी संघटनेला हिंदूंचा कथित पुळका |