जगातील ११० देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला ! – जागतिक आरोग्य संघटना
जिनिव्हा (स्वित्झर्लंड) – जागतिक स्तरावर कोरोनाच्या प्रकरणांमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनाची साथ संपली नसून ११० देशांमध्ये कोरोना वाढत असल्याचा खुलासा जागतिक आरोग्य संघटनेने केला. संघटनेचे प्रमुख टेड्रोस गेब्रेयसस म्हणाले की, कोरोना विषाणूच्या रूपात पालट झाला असला, तरी कोरोना अद्याप संपलेला नाही. कोरोना वाढीमध्ये ओमिक्रोनच्या बीए.४ आणि बीए.५ या दोन प्रकारांचा मोठा हात असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.
‘Pandemic Is Changing But Not Over’: WHO Says Covid-19 Cases On Rise In 110 Countrieshttps://t.co/toEtT880Gx
— ABP LIVE (@abplive) June 30, 2022
भारतात एका दिवसात १८ सहस्रांहून अधिक नवे कोरोना रुग्ण !
भारतात गेल्या २४ घंट्यांत १८ सहस्र ८१९ नवे कोरोना रुग्ण आढळून आले.
कोरोना ने फिर डराया, 122 दिन बाद एक्टिव मरीजों की संख्या 1 लाख पार #Corona #CoronaVirus #CoronaUpdate #COVID #Covid19 #IndiaCoronaUpdate https://t.co/GMqjXWWxLj
— Webdunia Hindi (@WebduniaHindi) June 30, 2022
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रीय रुग्णांची संख्या १ लाख ४ सहस्र ५५५ इतकी झाली आहे, तर गेल्या २४ घंट्यांत १३ सहस्र ८२७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.