कन्हैयालाल यांच्या हत्येच्या निषेधार्थ उदयपूरमध्ये सहस्रो हिंदूंचा मोर्चा !

राजस्थानमधीलअनेक जिल्ह्यांत ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद !  

उदयपूर (राजस्थान) – येथे कन्हैयालाल यांच्या झालेल्या क्रूर हत्येच्या विरोधात हिंदूंनी टाऊन हॉल ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर मोर्चा काढला. यात सहस्रो हिंदू सहभागी झाले होते. मोर्च्याच्या संपल्यानंतर काही तरुणांनी देहली गेट चौकात दगडफेक केली. तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार करून त्यांना पांगवले. या हत्येच्या निषेधार्थ राज्यातील जयपूर, उदयपूर, पाली, कोटा, जालोर, जैसलमेर आदी अनेक जिल्ह्यांत हिंदूंनी ‘बंद’ पाळण्याचे आवाहन केले होते. त्याला व्यापार्‍यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे या ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

राज्याचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी कन्हैयालाल यांच्या कटुंबियांना ५० लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य, तसेच त्यांच्या दोन्ही मुलांना सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री गहलोत कन्हैयालाल यांच्या कुटुंबियांची भेटही घेणार आहेत.