मणीपूर येथे भूस्खलन झाल्याने ५५ सैनिक मातीच्या ढिगार्याखाली दबले
६ जणांचे मृतदेह बाहेर काढले
इंफाळ (मणीपूर) – सातत्याने कोसळणार्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्यामुळे सैन्याचे ५५ सैनिक मातीमध्ये दबले गेले. यांतील ६ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ही घटना राज्यातील तुपुल रेल्वे स्थानकाजवळ घडली.
55 Territorial Army Jawans and labourers had gone missing due to landslide near Tupul Railway station in Noney district of Manipur. 13 evacuated safely. 7 dead bodies recovered. Full scale Rescue ops are underway by Assam Rifles, Indian Army, NDRF and district administration. pic.twitter.com/LseKLlU5pS
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) June 30, 2022
भूस्खलनामुळे येथील नदीचे पाणी रोखले गेल्याने येथे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या रेल्वे स्थानकाजळ नवे रुळ टाकण्याचे काम चालू असतांना त्याला सुरक्षा देण्यासाठी या सैनिकांची नियुक्ती करण्यात आली होती.