हिंदूंना अशा नेत्याची आवश्यकता आहे, जो हिंदूंचे १०० टक्के रक्षण करील !
कन्हैयालाल यांच्या हत्येविषयी नेदरलँडचे खासदार गिर्ट विल्डर्स यांचे ट्वीट
अॅम्स्टरडम (नेदरलँड) – ‘भारत, मी तुम्हाला एक मित्र समजून सांगत आहे की, आता असहिष्णुतेच्या प्रती सहिष्णु होणे बंद केले पाहिजे. जिहादी, आतंकवादी आणि कट्टरतावादी यांच्यापासून हिंदुत्वाचे रक्षण करा. इस्लामचे लांगूलचालन करू नका, अन्यथा याचे मूल्य चुकवावे लागेल. हिंदूंना अशा नेत्याची आवश्यकता आहे जो हिंदूंचे १०० टक्के रक्षण करील, असे ट्वीट नेदरलँड येथील ‘पार्टी फॉर फ्रीडम’ या पक्षाचे संस्थापक खासदार गिर्ट विल्डर्स यांनी केले. यापूर्वीही त्यांनी नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ ट्वीट केले होते.
Please India as a friend I tell you: stop being tolerant to the intolerant. Defend Hinduism against the extremists, terrorists and jihadists. Don’t appease Islam, for it will cost you dearly. Hindus deserve leaders that protect them for the full 100%!#HinduLivesMatters #India
— Geert Wilders (@geertwilderspvv) June 28, 2022
संपादकीय भूमिकाविदेशातील एका खासदाराच्या जे लक्षात येते, ते देशातील १०० कोटी हिंदूंच्या आणि त्यांच्या नेत्यांच्या लक्षात येत नाही, हे हिंदूंना लज्जास्पद ! |