नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून प्यावे ! – अभिजित बापट, मुख्याधिकारी, सातारा नगरपालिका
सातारा, २९ जून (वार्ता.) – पावसामुळे पालिकेच्या वतीने पुरवण्यात येणारे पिण्याचे पाणी गढूळ येऊ शकते. दक्षता म्हणून पिण्याचे पाणी उकळून प्यावे, असे आवाहन सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. कास आणि शहापूर येथून सातारावासियांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. पावसाचे प्रमाण पहाता पाणी गढूळ येण्याची शक्यता आहे. जलशुद्धीकरण केंद्रातून गढूळ पाणी शुद्ध करूनच पुरवले जाते; मात्र तरीही पाणी गढूळ आल्यास नागरिकांनी दक्षता म्हणून गढूळ पाणी उकळून प्यावे.