सांगली महापालिकेकडून १ ते ५ जुलैअखेर वसंत व्याख्यानमाला !
सांगली, २९ जून (वार्ता.) – सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेकडून वि.स. खांडेकर वाचनालयाच्या सांस्कृतिक शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत १ ते ५ जुलैअखेर वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. ही व्याख्यानमाला प्रतिदिन सायंकाळी ६ वाजता स्त्री सखी महिला मंडळ हॉल, विश्रामबाग येथे होणार आहे. याचे उद्घाटन १ जुलै या दिवशी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते, तर आयुक्त नितीन कापडणीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तरी अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.