स्थुलातून नमस्कार न करण्याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेले दृष्टीकोन
१ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांना स्थुलातून नमस्कार करण्यापेक्षा ‘सत्सेवा करणे’ अधिक महत्त्वाचे असल्याचे सांगणे ! : ‘एकदा मी परात्पर गुरु डॉक्टरांना म्हटले, ‘‘परम पूज्य, मी कधीच तुम्हाला स्थुलातून नमस्कार केला नाही.’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘स्थुलातून नमस्कार करण्यात १ मिनीट वेळ वाया घालवण्यापेक्षा ‘सत्सेवा’ करणे अधिक महत्त्वाची आहे. मला नमस्कार करण्यात कशाला वेळ घालवायचा !’’
१ आ. साधक संतांना मानस नमस्कार करत असल्यामुळे संतांना समष्टी साधना करण्यासाठी वेळ देता येणे : एकदा परात्पर गुरु डॉक्टर एक लिखाण वाचत होते, त्यात एका संतांना सर्व भाविक नमस्कार करत असल्याचा उल्लेख होता. ते वाचून परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘बरे झाले ना, आपल्याकडे (सनातन संस्थेत) कुणी संतांना स्थुलातून नमस्कार करत नाही. नाहीतर संतांचा सगळा वेळ त्यातच गेला असता ! साधक संतांना मानस नमस्कार करत असल्यामुळे संतांना समष्टी साधना करण्यासाठी वेळ देता येतो.’’
– कु. रूपाली कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.