हीच संधी गुरूंचे मन जिंकण्याची ।
आपत्काळातील गुरुपौर्णिमा आली आता ।
साधकांनो, सेवेची अमूल्य संधी आपल्याकरिता ।
मनोभावे वाढवूया नामजप, प्रार्थना आणि कृतज्ञता ।
हेच साधन जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून सुटण्याकरिता ।। १ ।।
तीव्रता वाढत चालली आपत्काळाची ।
प्रक्रिया राबवूया स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची ।
पराकाष्ठा करूया ध्येय गाठण्याची ।
हीच संधी गुरूंचे मन जिंकण्याची ।। २ ।।
तळमळ वाढवूया धर्मप्रसार करण्याची ।
प्रसार करता करता आठवण असावी नामाची ।
प्रयत्न करूया सतत एकाग्रता साधण्याची ।
धडपड करावी काहीतरी नवीन शिकण्याची ।। ३ ।।
– श्री. अनिल कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ७६ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२४.६.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |