महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. मनोज सहस्रबुद्धे यांनी पूर्वीचे अन् आताचे कलाकार यांचा संगीतविषयक केलेला तौलनिक अभ्यास !
मी मागील १५ वर्षांपासून सतारीचा प्रतिदिन एक ते दोन घंटे सराव करत आहे. काही दिवसांपूर्वी मी ‘यू ट्यूब’वरून संगीत कलाकारांचे (जाणकार गायक आणि वादक यांचे) ‘डाऊनलोड’ केलेले वार्तालाप (मुलाखती) टंकलेखन करण्याची सेवा करत होतो. ती सेवा करतांना माझा पूर्वीच्या कलाकारांच्या संगीत साधनेच्या प्रवासातील अनेक पैलूंचा अभ्यास झाला. त्यातून त्यांनी योग्य गुरु शोधण्यासाठी केलेली धडपड, त्यांचा श्री गुरूंविषयी असलेला अपार भाव, त्यांनी त्यांच्या श्री गुरूंची सांगितलेली महती, त्यांनी केलेली गुरुसेवा, त्यांनी कलेसाठी वाहिलेले जीवन इत्यादी अनेक गोष्टी माझ्या लक्षात आल्या. त्याच समवेत काहींनी या क्षेत्रातील नवीन पिढीविषयी विशद केलेली खंतही लक्षात आली. तेव्हा देवाच्या कृपेने पूर्वीचे जाणकार कलाकार आणि आताचे संगीत कलाकार यांच्या संगीत साधनेविषयी काही तुलनात्मक सूत्रे माझ्या लक्षात आली. सर्वांना शिकण्यासाठी ती सूत्रे पुढे दिली आहेत.
‘पूर्वीच्या ऋषितुल्य कलाकारांप्रमाणे चांगल्या संगीत कलाकारांची साधनेकडे वाटचाल होवो’, हीच श्री गुरुचरणी प्रार्थना आहे.
– श्री. मनोज सहस्रबुद्धे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), संगीत अभ्यासक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (६.६.२०२२)