इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंत १०० टक्के अभ्यासक्रम पूर्ववत् शिकवला जाणार !
मुंबई, २९ जून (वार्ता.) – कोरोनाच्या संकटकाळात शिक्षण ऑनलाईन घेण्यात आले होते. या वेळी विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण न्यून व्हावा, यासाठी वर्ष २०२० ते २०२२ या कालावधीत इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंत अभ्यासक्रम २५ टक्के न्यून करण्यात आला होता. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून हा अभ्यासक्रम पूर्ववत् १०० टक्के शिकवला जाणार आहे.