हिंदु धर्माखेरीज अन्य कोणत्याही धर्माला इतक्या मोठ्या प्रमाणात कलंकित केले जात नाही ! – मारिया वर्थ, हिंदु धर्माच्या अभ्यासक आणि विचारवंत
१. हिंदु धर्माला कलंकित करण्यात ख्रिस्ती धर्मप्रसारक आघाडीवर असणे
मी पोप फ्रान्सिस यांना पाठवलेल्या खुल्या पत्रातील हा उतारा मुसलमान मौलवींनाही लागू पडतो. ‘कदाचित् सन्माननीय पोप यांचा समज असेल, ‘हिंदु धर्म हा नीतीभ्रष्ट आहे आणि हिंदू त्यांच्या धर्मात असलेल्या अनेक देवतांऐवजी ख्रिस्ती धर्मातील एकाच देवाला स्वीकारतील’; पण त्यांचा जर असा समज असेल, तर तो पूर्णपणे चुकीचा आहे. कलंकित केला जाणारा किंवा ज्याच्यावर अन्याय होत आहे, असा हिंदु धर्माखेरीज अन्य कोणताही धर्म नाही; परंतु सांगण्यास खेद वाटतो की, हिंदु धर्माला कलंकित करण्यात ख्रिस्ती धर्मप्रसारक (कॅथॉलिक धर्मप्रसारक धरून) आघाडीवर आहेत.
२. हिंदु धर्मातील विचार सत्यावर, तर ख्रिस्त्यांचे विचार कट्टर अन् असत्यावर आधरित असणे
भारतीय प्राचीन परंपरा किती महान आहे, याविषयी काहीच पाश्चिमात्य लोकांना ठाऊक आहे. आता आपल्याला जे धर्म ठाऊक आहेत, त्याच्या कितीतरी आधी प्राचीन भारतात आपल्या अस्तित्वाविषयीचे तत्त्वज्ञान, तसेच अर्थपूर्ण जीवन जगण्याविषयीचे सिद्धांत ठाऊक होते. ख्रिस्त्यांनी नवीन काय आणले, तर पडताळणी करता येत नसलेले कट्टर विचार, जे कदाचित् पूर्ण सत्यावर आधारीत नसावेत. इतिहासातील एखाद्या घटनेचा पूर्ण सत्यावर परिणाम होऊ शकतो का ? बाप्तिस्मा घेतलेले आणि न घेतलेले लोक असा भेदभाव सत्य करू शकते का ? चर्चविना मोक्ष मिळू शकत नाही का ? मी अशी कठोर भाषा वापरत असल्याविषयी मला क्षमा करावी.
३. ख्रिस्त्यांच्या कित्येक युगे आधी ऋषींनी हिंदु धर्मात अनेक सिद्धांत लागू करणे वा शोध लावणे
भारतातील ऋषींनी कित्येक युगांपूर्वी शोध लावला की, सर्वत्र व्याप्त असणे, हा विश्वाचा गाभा आहे, ज्याचे वर्णन करता येत नाही; परंतु संपूर्ण जाणीव किंवा शुद्धी असे त्याचे वर्णन करू शकतो. ‘जे पेराल ते उगवेल’, या ख्रिस्ती म्हणीच्या कितीतरी युगे आधी हिंदु धर्मातील कर्माचा सिद्धांत हाच होता. ख्रिस्ती परिषदेने पुनर्जन्मावर विश्वास ठेवण्यापासून ख्रिस्त्यांना रोखले. खरे म्हणजे यामुळे त्यांना त्रासदायक ठरणारी कितीतरी कोडी उलगडली असती. उदा. जन्माच्या वेळीच अन्याय होतो का ? आध्यात्मिक मार्गावर चालतांना एखाद्या परिपूर्ण असलेल्या माणसाला मित्र किंवा मार्गदर्शक म्हणून घेण्याचे लाभ भारतात ठाऊक होते. २ सहस्र वर्षांपूर्वी ‘केवळ श्रीकृष्ण किंवा राम अथवा बुद्ध हेच मोक्ष देऊ शकतात आणि त्यांच्यावर विश्वास न ठेवणारे नरकात जातात’, असे हिंदु धर्मात कुणीही म्हटलेले नाही. सत्य हे एकच आहे आणि ज्ञानी लोक त्याला अनेक नावाने संबोधत असतात.
भारतातील ऋषींनी वेगवेगळ्या देवतांची नावे सांगितली. त्या वेळी ख्रिस्ती धर्म दृष्टीक्षेपातही नव्हता. कदाचित् त्यांनी ‘गॉड’ हे अजून एक नाव आणि ‘जिझस हा अवतार’ हे त्यात अंतर्भूत केले असते. सत्य हे केवळ एकाच नावाने ओळखले जावे आणि त्याचे वर्णन केवळ एका पुस्तकात आहे. ते सत्य म्हणजे ‘गॉड’ असे घोषित करून त्यांच्या अनुयायांनी पाठीत खंजीर खुपसणे, हे ऋषींना अपेक्षित नव्हते.
४. ख्रिस्त्यांनी हिंदु देवतांना सैतान संबोधून अवमान करणे
हिंदु धर्मातील अनेक देवता या शक्ती आहेत, ज्या आपल्या सर्वांमध्ये असलेल्या निर्गुण आणि नाव नसलेल्या ईश्वरी तत्त्वाचा शोध घेण्यात साहाय्य करतात. भारतातील ख्रिस्त्यांना ‘हिंदु देवता या सैतान आहेत’, असे सांगितले जाते, हे कोणत्या आधारे ? याला काहीच आधार नाही. त्यामुळे हा स्वीकारता न येण्याजोगा अवमान आहे. तरीही ख्रिस्ती धर्मात (हिंदु धर्माकडून स्फूर्ती घेऊन) देवदूतांवर विश्वास ठेवला जातो; कारण काही प्रतिमांच्या आधारे निर्गुण निराकार ईश्वराची भक्ती करता येते.
५. ‘प्रत्येकामध्ये ईश्वर आहे’, या वैज्ञानिक दृष्टीकोनाला चर्चने विरोध करणे अनाकलनीय !
हिंदु धर्म हा केवळ विश्वासावर नाही, तर ज्ञानावर आधारीत आहे. आमच्यासह जगाविषयी काय सत्य आहे, याचा खरोखरचा शोध या धर्मात घेतला आहे. ज्याला काही अर्थ नाही आणि ज्याची पडताळणी करता येत नाही, अशांवर विश्वास ठेवण्याची हिंदूंना आवश्यकता नाही. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. बहुतांश हिंदूंचा पुनर्जन्मावर विश्वास आहे आणि त्याला काहीतरी अर्थ आहे. बहुतेक हिंदूंचा सर्वत्र व्यापून राहिलेल्या ब्रह्मावर (याला इतरही नावे आहेत) विश्वास आहे. सर्वत्र व्याप्त असलेले म्हणजे सर्व माणसांमध्येही असलेले असे ब्रह्म ! माणसाने भक्तीबरोबर काही नियम पाळले, तर त्या ईश्वरी तत्त्वाची स्वतःमध्ये अनुभूती घेता येते, असा काही जणांचा विश्वास आहे. हा विश्वास किंवा श्रद्धा ही अंध नाही, तर पडताळलेला आहे. अनेक ऋषींनी ब्रह्माशी एकरूप होण्याची अनभूती घेतलेली आहे. ख्रिस्ती धर्मातही काही गूढवादी होते, ज्यांनी ब्रह्माशी एकरूप होण्याची अनुभूती घेतली होती. उदा. मेस्टर एकहार्ट. असे असले, तरी खेदाची गोष्ट आहे की, चर्चने त्यांना बहिष्कृत केले. ‘प्रत्येकामध्ये ईश्वराचे अस्तित्व आहे’, याविषयीच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाला चर्च विरोध का करत आहे ? आणि एवढा अवधी होऊनही मानवाच्या प्रदीर्घ इतिहासात सत्याचा मार्ग दाखवणारे अनेक व्यक्तिमत्वे होती, हे स्वीकारणे कठीण का जात आहे ?
– मारिया वर्थ, हिंदु धर्माच्या अभ्यासक आणि विचारवंत