डोंबिवली येथे विकासकाला फसवणार्या भोंदूबाबाला अटक !
तिघांना अटक
ठाणे, २९ जून (वार्ता.) – कोट्यवधी रुपयांचा पैशाचा पाऊस पडेल, या आमिषाला बळी पाडून डोंबिवली पूर्वेकडील चोळे गावातील बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र पाटील यांची ५६ लाख रुपयांची रक्कम घेऊन भोंदूबाबासह ५ भामटे पसार झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी अशोक गायकवाड, रमेश मोकळे, आणि भोंदूबाबा महेश गुरुजी यांना अटक केली आहे, तर शर्मा आणि गणेश हे दोघे पसार असून मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.