सोलापूर येथे प्राणीसंग्रहालयाचे संचालक पद मागील २ वर्षांपासून रिक्त !
सोलापूर – केंद्रीय प्राणीसंग्रहालय संचालनालयाच्या निर्देशानुसार पूर्णवेळ प्राणी संग्रहालय संचालकाची नेमणूक करण्याची प्रक्रिया मागील १ वर्षापासून चालू आहे. ऑगस्ट २०२१ पर्यंत ३ वेळा विज्ञापन प्रसिद्ध करूनही संचालक पदासाठी प्रतिसाद न मिळाल्याने २४ जून या दिवशी महापालिकेने वाढीव मानधनासह संचालक आणि पशूवैद्यकीय अधिकारी पदाचे विज्ञापन प्रसिद्ध केले आहे. ऑगस्ट २०२१ मधील विज्ञापनामध्ये ५ वर्षांच्या अनुभवी संचालकपदासाठी ३० सहस्र रुपये मानधन देऊ केले होते. २ वर्षांपासून चालू असलेल्या या निवड प्रक्रियेत ५ वर्षांच्या अनुभवाच्या अटींमुळे योग्य उमेदवार मिळत नसल्याचे समोर येत आहे.
केंद्रीय प्राणीसंग्रहालय संचालनालयाने दाखवलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी महापलिका प्रयत्नरत असली तरी संचालक पदासाठी प्रतिसाद न मिळाल्याने प्राणीसंग्रहालय चालू होण्यास विलंब लागत आहे.