एस्.टी.च्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला ३० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ !
मुंबई – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एस्.टी.) ज्येष्ठ नागरिक, तसेच विविध सामाजिक घटकांना प्रवासभाड्यात सवलत देण्यासाठी ‘स्मार्ट कार्ड’ योजना १ जून २०१९ पासून ‘स्मार्ट कार्ड’ योजना चालू केली आहे. आतापर्यंत या योजनेसाठी ३० लाखांहून अधिक व्यक्तींची नोंद झाली आहे. ज्येष्ठ नागरिक, पुरस्कारप्राप्त व्यक्ती, विद्यार्थी, तसेच रुग्ण यांना हे ‘स्मार्ट कार्ड’ देण्यात येते. कोरोनाचा संसर्ग, एस्.टी. कर्मचार्यांचा संप यांमुळे स्मार्ट कार्ड नोंदणीकरण आणि वितरण बंद होते.
या योजनेला ३० ऑगस्ट २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रा असल्यामुळे यात्रेमध्ये ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये; म्हणून ही मुदतवाढ देण्यात आली आहे. १ सप्टेंबर २०२२ पासून स्मार्ट कार्ड बंधनकारक केले जाणार आहे.