मदरशांत मुलांना ‘ईशनिंदा’ करणार्यांचा शिरच्छेद करण्याची शिकवण दिली जाते ! – केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान
नवी देहली – द्वेषाच्या मुळाशी मदरशांची शिकवण आहे. तेथे लहानपणापासून ‘कुणी ‘ईशनिंदा’ केली, तर त्यांचा शिरच्छेद करा’, अशी शिकवण दिली जाते, अशी माहिती केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी दिली. तथापि कुराणमध्ये असे लिहिलेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘मदरसों में पढ़ाते हैं ईशनिंदा की सजा है सिर काटना’: उदयपुर हत्याकांड पर केरल गवर्नर आरिफ मोहम्मद #news #dailyhunt https://t.co/DTHvdYGafJ
— Dailyhunt Hindi (@DH_Hindi) June 29, 2022
यापूर्वीही वेळोवेळी खान यांनी ‘मौलाना (इस्लामी विद्वान) आणि मदरसे हे मुसलमानांना कट्टर बनवत आहेत. ते लहानपणापासून मुसलमान मुलांमध्ये मुसलमानेतरांच्या विरोधात द्वेष पसरवतात. त्यामुळे मुले मोठी झाली, तरी ती अन्य धर्मियांकडे संशयाच्या दृष्टीनेच पहातात’, असे विधान केले आहे.
संपादकीय भूमिकाकेंद्र सरकार अशा मदरशांवर बंदी का घालत नाही ? |