कर्नाटक सरकार ‘काशी यात्रा’ करू इच्छिणार्यांना प्रत्येकी ५ सहस्र रुपये देणार !
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकच्या भाजप शासनाने ‘काशी यात्रा’ नावाच्या योजनेस स्वीकृती दिली आहे. याअंतर्गत वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर पहाण्यास इच्छुक असलेल्या ३० सहस्र भाविकांना प्रत्येकी ५ सहस्र रुपये अनुदान दिले जाणार आहे. यासाठी राज्यातील धार्मिक देणगी विभागाने ७ कोटी रुपये स्वीकृत केले आहेत.
Karnataka Launches Kashi Yatra Scheme For Pilgrims, Offers Rs 5,000: Check How to Avail Facilities#karnataka #kashivishwanath #KashiYatra #news https://t.co/10Ba3G9C2v
— India.com (@indiacom) June 27, 2022
राज्याच्या धार्मिक देणगी, हज आणि वक्फ मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या की, या योजनेचा लाभ केवळ मूळ कर्नाटकातील जनताच घेऊ शकेल. आयुष्यात एकदाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
संपादकीय भूमिका
|