मुसलमानांनी केलेल्या शिरच्छेदाचा जमियत उलेमा-ए-हिंदकडून निषेध !
उदयपूर येथील कन्हैय्यालाल यांच्या हत्येचे प्रकरण
नवी देहली – जमियत उलेमा-ए-हिंद या इस्लामी संघटनेचे महासचिव मौलाना (इस्लामी विद्वान) हकीमुद्दीन कासमी यांनी उदयपूर येथे मुसलमानांनी कन्हैय्यालाल यांच्या केलेल्या शिरच्छेदाचा निषेध केला आहे. कासमी म्हणाले की, ज्यांनी कुणी हे कृत्य केले आहे, त्यास योग्य ठरवले जाऊ शकत नाही. हे कृत्य देशातील कायदा आणि आमच्या धर्माच्या विरोधात आहे. कुणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. कासमी यांनी सर्व नागरिकांना त्यांच्या भावन नियंत्रणात ठेवण्याचे आणि देशातील कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे.
Udaipur Tension: Following the horrific killing, local markets in the area were shut as the traders demanded justice for the victim.https://t.co/hZTDIZsGsk
— Hindustan Times (@htTweets) June 29, 2022
राजस्थानमध्ये एका मासासाठी १४४ कलम लागू !
राजस्थानचे मुख्य सचिव यांनी राज्यभरात जमावबंदीचे १४४ हे कलम लागू केले असून उदयपूरमध्ये २४ घंट्यांसाठी इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. कन्हैय्यालाल यांच्या हत्येच्या अन्वेषणासाठी विशेष अन्वेषण पथकाची स्थापनाही करण्यात आली आहे.
दोषींच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल ! – मुख्यमंत्री गहलोत
हत्या करणार्या दोघा आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी दिली. गहलोत म्हणाले की, मी या घटनेचा निषेध करतो. अपराध्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. पोलिसांनी घटनेच्या मुळाशी जायला हवे. गहलोत यांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहनही केले.
संपादकीय भूमिकावर्ष २०१९ मध्ये अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून हिंदूंच्या बाजूने निकाल लागल्यावर जमियत उलेमा-ए-हिंदनेच ‘आजचा दिवस हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वांत काळा डाग आहे’, असे म्हटले होते. त्यामुळे अशा हिंदुविरोधी संघटनेने उदयपूरच्या घटनेचा निषेध करणे, हे केवळ नाटक आहे, असे म्हटल्यास चूक ते काय ? |