संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचा पवित्र नीरा नदीत स्नान सोहळा !
सातारा – येथील नीरा नगरीत संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी २८ जून या दिवशी सकाळी ११ वाजता प्रवेश झाली. यानंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी चौकात पालखी सोहळ्याचे स्वागत ग्रामस्थांनी केले. यानंतर पुणे आणि सातारा जिल्ह्यांची सीमा असलेल्या नीरा नदीच्या दत्त घाटावर स्नान सोहळा झाला. मानाचे अश्व, भगव्या पताका, वीणा घेतलेले वारकरी आणि माऊलींचा फुलांनी सजवलेला रथ असे डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य होते. सोहळ्यातील मानकऱ्यांनी माऊलींच्या पादुका दत्तघाटावर आणल्या. ‘माऊली माऊली’च्या जयघोषात मोठ्या उत्साहात पादुकांना स्नान घालण्यात आले. दुपारचे भोजन आणि विसावा घेतल्यावर सोहळा दुपारी १ वाजता मार्गस्थ झाला.