पोलीस उपनिरीक्षकाने महिलेला थप्पड मारली !
-
विरोध करणार्या महिलेच्या पतीवर उपनिरीक्षकाकडून गोळीबार !
-
उपनिरीक्षक निलंबित !
मोहाली (पंजाब) – जिल्ह्यातील डेराबस्सी शहरात २६ जूनच्या रात्री पोलीस उपनिरीक्षक बलविंदर सिंह यांनीे एका महिलेशी दुर्व्यवहर केला. यास तिच्या पतीने विरोध केल्यामुळे सिंह यांनी पतीवर गोळीबार केला. रात्री दोन बहिणी आणि त्यांच्यातील एकीचा पती रस्त्यावर आईस्क्रीम खात उभे होते. तेथून पहारा देणार्या पोलिसांचे वाहन चालले होते. त्या वेळी पोलिसांचा त्या तिघांशी वाद झाला. उपनिरीक्षक सिंह यांनी त्यांतील एका महिलेला थप्पड मारल्याने तिच्या पतीने सिंह यांना विरोध केला. यावर सिंह यांना राग अनावर होऊन त्यांनी पतीवर गोळीबार केला.
ये है केजरीवाल की पंजाब पुलिस
पंजाब: एएसआई बलविंदर सिंह ने जीरकपुर (मोहाली) के पास डेराबस्सी में एक निहत्थे व्यक्ति को गोली मार दी। मौके पर मौजूद अन्य पुलिसकर्मी इधर-उधर भटकते नजर आ रहे हैं।
केजरीवाल पंजाब को बर्बाद कर दिया pic.twitter.com/4XukDWOWiL— Anuja Kapur (@anujakapurindia) June 28, 2022
१. पीडितेने आरोप केला आहे की, सर्व पोलीस त्या वेळी नशेमध्ये होते.
२. मोहालीचे पोलीस अधीक्षक विवेकशील सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपनिरीक्षक बलविंदर सिंह यांना निलंबित करण्यात आले आहे. तथापि या घटनेविषयी कुणीही तक्रार न केल्याने गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही. (कुणी तक्रार केली, तरच गुन्हा नोंद करणार का ? अशा पोलीस अधिकार्यांवरही त्यांच्या वरिष्ठांनी कारवाई करावी, असे कुणाला वाटल्यास चुकीचे काय ? – संपादक)
३. भाजपचे देहलीतील नेते तेजिंदर सिंह बग्गा यांनी या घटनेला विरोध केला आहे. पंजाब पोलीस नागरिकांना ‘माणूस’ समजत नाहीत, अशा शब्दांत बग्गा यांनी पंजाब पोलिसांवर टीका केली.
संपादकीय भूमिकाअशा पोलिसांवर कठोर कारवाई होणेच आवश्यक ! |