सर्वांशी जवळीक साधणाऱ्या आणि गुरुकार्याचा ध्यास असलेल्या सनातनच्या १०९ व्या समष्टी संत पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे (वय ७९ वर्षे) !
वर्ष १९९९ पासून मिरज येथे सनातनच्या कार्याला प्रारंभ झाला. त्यानंतर दैनिक ‘सनातन प्रभात’ची सांगली आणि कोल्हापूर आवृत्ती चालू झाली. त्या वेळी दैनिक ‘सनातन प्रभात’चे कार्यालय पू. डॉ. शरदिनी कोरे यांच्या रुग्णालयात एका ठिकाणी होते. तेव्हा माझा त्यांच्याशी परिचय झाला. तेथे दैनिक कार्यालय चालू झाल्यानंतर त्यांनी साधकांना कोणत्याही गोष्टींची उणीव भासू दिली नाही.
१. नम्रता
पू. कोरेकाकू प्रत्येकाशी नम्रतेने बोलतात. त्यामुळे त्यांची प्रत्येकाशी जवळीक होते.
२. प्रेमभाव
पू. काकू स्त्रीरोगतज्ञ म्हणून कार्यरत असतांना त्यांचा स्वभाव कडक होता; मात्र त्या साधनेत आल्यानंतर त्यांच्यामधील ‘नम्रता आणि प्रेमभाव’ या गुणांत वृद्धी झाली. त्यांनी त्यांच्या रुग्णालयातील खोल्या साधकांना रहाण्यासाठी दिल्या होत्या. त्या साधकांची आपुलकीने विचारपूस करत असत. त्या त्यांची चारचाकी केव्हाही साधकांना वापरण्यासाठी देत असत.
३. साधकांना विनामूल्य औषधे देणे
साधक स्वतःच्या आजारपणाविषयी पू. कोरेकाकूंना सांगत असतांना त्या साधकांना नम्रपणे सर्व माहिती सांगत असत आणि औषधे देत असत. त्यांनी साधकांना विनामूल्य औषधे देऊन साहाय्य केले आहे.
४. गुरुकार्याचा ध्यास
अ. पू. काकू कोणतीही सेवा भावपूर्ण आणि तळमळीने करत. त्या गुरुपौर्णिमा, हिंदु-राष्ट्र जागृती सभा आणि अन्य वेळी झोकून देऊन सेवा करत होत्या.
आ. प्रारंभी त्यांच्याकडे अध्यात्मप्रसार करण्याची आणि नंतर विज्ञापने मिळवण्याची सेवा होती. या सेवा त्यांनी भावपूर्ण केल्या. त्या प्रख्यात स्त्रीरोगतज्ञ आहेत. त्यांना समाजात मान आहे. असे असतांनाही त्यांनी न्यूनपणा वाटून न घेता समाजात फिरून अध्यात्माचा प्रसार केला.
– श्री. सचिन कौलकर, सनातन आश्रम, मिरज. (२५.६.२०२२)