दक्षिण कन्नड जिल्ह्यात अवैधपणे वास्तव्य करणार्या परदेशी नागरिकांचे सर्वेक्षण करा ! – कर्नाटकचे गृहमंत्री
मंगळुरू – कर्नाटकचे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी दक्षिण कन्नड जिल्ह्याच्या पोलिसांना जिल्ह्यात अवैधपणे रहाणार्या परदेशी नागरिकांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले. ‘व्हिसा’ची मुदत संपूनही आणि वैध कागदपत्रे नसतांनाही कर्नाटकात रहाणार्या परदेशी नागरिकांचा शोध घेणे, हे सर्वेक्षणाचे उद्दिष्ट असल्याचे ज्ञानेंद्र म्हणाले.
Karnataka Home Minister Araga Jnanendra has directed the Dakshina Kannada district police and the city police commissionerate to conduct station-level survey of foreign nationals illegally staying in the districthttps://t.co/E3bY2U0WlV
— Hindustan Times (@htTweets) June 28, 2022
गृहमंत्री यांनी सांगितले की, पोलिसांना ‘परदेशी नागरिकांकडे बनावट आधारकार्ड, रेशनकार्ड किंवा मतदान ओळखपत्र आहेत का’, हे शोधून काढावे लागेल. या प्रकरणी पोलिसांना दोन आठवड्यात अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. गृहमंत्री ज्ञानेंद्र यांनी जिल्हा पोलिसांच्या वरिष्ठ अधिकार्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर ही माहिती दिली. बेंगळुरूमध्ये असे सर्वेक्षण नुकतेच करण्यात आल्याचेही ते म्हणाले.
संपादकीय भूमिकाअसे निर्देश का द्यावे लागतात ? पोलिसांना हे स्वत:हून कसे लक्षात येत नाही ? |