भाववृद्धीसाठी प्रयोग करत असतांना कु. पूनम किंगर यांना आलेल्या अनुभूती

कु. पूनम किंगर

१. नेहमी देहली सेवाकेंद्रात गेल्यावर मनाला शांती लाभत असूनही सत्संगासाठी तेथे जावेसे न वाटणे

२७.९.२०१९ या दिवशी देहली सेवाकेंद्रामध्ये सत्संगाला जाण्याविषयी जिल्हासेवकांनी मला विचारले. पूर्वी सेवाकेंद्रात जाण्याची संधी मिळताच मी उत्साहाने जात असे. तेथे जाऊन माझ्या मनाला पुष्कळ शांती मिळत असे; परंतु या वेळी माझ्या मनामध्ये नकारात्मक विचार येऊन मला तिथे जायची इच्छा होत नव्हती.

२. भाववृद्धी सत्संगात दत्तगुरूंचे ध्यान करण्यास सांगितल्यावर ते वडिलांप्रमाणे हात धरून देहली सेवाकेंद्राच्या बाहेर घेऊन गेल्याचे दृश्य दिसणे

माझ्या मनातील विचारावर मात करून मी देहली सेवाकेंद्रात गेले. त्या रात्री भाववृद्धी सत्संगही होता. सत्संग घेणाऱ्या साधिकेने ‘आपण दत्तगुरूंचे ध्यान करून त्यांना अनुभवण्याचा प्रयत्न करूया’, असे सांगितले. मी डोळे बंद केल्यावर ‘दत्तगुरूंनी माझा हात पकडला आहे आणि वडील जसे लहान मुलांचा हात पकडून चालतात, तसे ते माझा हात धरून चालत आहेत अन् आम्ही दोघे सेवाकेंद्राच्या बाहेर दरवाजा उघडण्याची वाट पहात आहोत’, असे दृश्य मला दिसले.

३. सत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या चैतन्यमय स्वरूपाचे वर्णन करणे अन् त्या वेळी स्वतःचे अस्तित्व न जाणवता त्या दोघींचे अस्तित्व जाणवणे

सत्संगात सहसाधिकेने भाववृद्धीसाठी प्रयोग घेतला. तिने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना नमस्कार केला आणि ती श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चैतन्यमय स्वरूपाचे वर्णन करू लागली. तेव्हा ‘दोन्ही देवी माझ्या आत प्रवेश करत आहेत आणि मी त्यांच्याशी एकरूप होत आहे’, असे मला वाटले. मला माझे अस्तित्व न जाणवता श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अस्तित्व जाणवत होते.

४. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना नमस्कार करावा’, असे वाटल्यावर त्यांचे चरण न दिसता स्वतःचे एक मोठे रूप दिसून त्याला स्वतःचे दुसरे छोटे रूप नमस्कार करत असल्याचे दिसणे

‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चैतन्याचा पिवळा प्रकाश माझ्यावर आणि माझ्या चोहोबाजूंना पसरत आहे’, असे मला वाटले. त्या वेळी माझ्या मनात ‘मला त्यांच्या चरणांना स्पर्श करावा’, असा विचार येत होता; परंतु मला त्यांचे चरण दिसत नव्हते. तेव्हा ‘चरण माझ्या आत आहेत’, याची मला जाणीव झाली. त्या वेळी मला ‘माझे एक रूप पुष्कळ मोठे झाले आहे आणि माझे दुसरे रूप लहान झाले आहे’, असे दिसले. ‘तेव्हा माझे लहान रूप माझ्या मोठ्या रूपाला साष्टांग नमस्कार करत आहे’, असे मला दिसले. त्या संदर्भात सद्गुरु पिंगळेकाकांनी सांगितले, ‘‘मोठे रूप म्हणजे प.पू. गुरुदेव आहेत आणि लहान रूप त्यांना नमस्कार करते, म्हणजे तुमचा दास्यभावात रहाण्याचा प्रयत्न होत आहे.’’

५. सत्संगात देवाला प्रार्थना केल्यावर स्वतःचा तोंडवळा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यासारखा झाला असल्याचे मनात अनुभवणे

देवाला प्रार्थना करत असतांना दोन वेळा ‘माझ्या तोंडवळ्यावरील हावभाव श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या तोंडवळ्यावरील हावभावाप्रमाणे झाले आहेत आणि माझा तोंडवळा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या तोंडवळ्यासारखा झाला आहे’, असे माझे मन अनुभवत होते. त्या वेळी मला माझा तोंडवळा दिसत नव्हता.’

– कु. पूनम किंगर, फरीदाबाद (२७.९.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक