सनातनच्या ग्रंथांच्या अद्ययावत् सूची प्रसारासाठी उपलब्ध !
साधकांना सूचना
सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित केलेले सर्व ग्रंथ आणि लघुग्रंथ यांच्या ‘ए ४’ आकारातील अद्ययावत सूची प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या सूची दोन प्रकारांत उपलब्ध आहेत.
१. ग्रंथसूची प्रकार १
ही सूची केवळ मराठी भाषेतील ग्रंथांची आहे. यामध्ये ग्रंथांच्या नावापुढे केवळ पृष्ठसंख्या आणि मूल्य दिले आहे.
२. ग्रंथसूची प्रकार २
ही सूची मराठीसह अन्य सर्व भाषांतील ग्रंथांची आहे. या सूचीमध्ये ग्रंथ कोणकोणत्या भाषेत उपलब्ध आहेत, हे देण्यात आले आहे.
या सूची नेहमीच्या संगणकीय पत्त्यावर उपलब्ध करण्यात आल्या आहेत. साधकांनी ग्रंथ आणि उत्पादने यांचे वितरण कक्ष, प्रदर्शने, वाचनालये आदी सुयोग्य ठिकाणी आवश्यकतेनुसार योग्य प्रकारची सूची अधिकाधिक उपयोगात आणून धर्मशिक्षण देणारे ग्रंथ समाजात पोचवण्यासाठी प्रयत्न करावेत.