‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन  निर्विघ्न पार पडावे’, यासाठी रामनाथी आश्रमातील श्री सिद्धिविनायकाला अभिषेक करतांना आलेल्या अनुभूती

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

१. ‘श्री सिद्धिविनायक श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या दर्शनाने अत्यंत आनंदी झाला आणि त्याने श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईंकडे पाहिल्याचे मला जाणवले.

२. श्रीसत्‌शक्ति बिंदाताई श्री सिद्धिविनायकाला अत्यंत वात्सल्यभावाने आणि भावपूर्ण अभिषेक करत होत्या. तेव्हा ‘श्रीसत्‌शक्ति बिंदाताई यांचे ध्यान लागून त्या समाधी अवस्थेत आहेत आणि गणपति त्यांना ‘माते, येथे जल घाल, येथे जल घाल’, असे सांगत आहे.

सौ. क्षिप्रा जुवेकर

३. ‘हा अभिषेक ब्रह्मांडात होत असून संपूर्ण जगभरातील श्री गणपतींच्या मूर्ती ‘हिंदु राष्ट्रा’साठी चैतन्य आणि आशीर्वाद देत आहेत’, असे जाणवणे : अभिषेक पहातांना मला वाटले, ‘हा अभिषेक केवळ येथे असलेल्या श्री सिद्धिविनायक देवापुरताच मर्यादित नसून संपूर्ण ब्रह्मांडात चालू आहे. संपूर्ण जगभरात जेथे जेथे गणपतीच्या मूर्ती आहेत, तेथील सर्व मूर्ती या अभिषेकाने जागृत होऊन ‘हिंदु राष्ट्रा’साठी आशीर्वाद आणि चैतन्य देत आहेत.

४. श्रीसत्‌शक्ति बिंदाताईंच्या मस्तकावर सुंदर मुकुट असून त्या आठ भुजांनी श्री सिद्धिविनायकावर अभिषेक करत आहेत.

५. श्री सिद्धिविनायकाकडून लाल रंगांच्या लहरी निघून त्या संपूर्ण ब्रह्मांडात पसरत आहेत.

६. ‘श्री सिद्धिविनायकाचे वाहन असलेला उंदीर पुष्कळ आनंदी आणि कृतज्ञताभावात आहे’, असे त्याच्या तोंडवळ्यावरून दिसत होते.

७. या विधीमुळे ‘आमचे सर्व त्रास नष्ट झाले’, असे मला जाणवले.

‘श्री गुरूंच्या अपार कृपेने मला इतिहासात सुवर्णाक्षरांत लिहिल्या जाणाऱ्या अद्भुत विधीला उपस्थित रहाण्याची संधी देऊन या अनुभूती दिल्या’, याबद्दल मी त्यांच्या पावन चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– सौ. क्षिप्रा जुवेकर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), जळगाव सेवाकेंद्र (८.६.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक