म्हैशाळ (जिल्हा सांगली) येथील ९ जणांची आत्महत्या नव्हे, तर हत्या !
सोलापूर येथून दोघांना अटक !
सांगली, २७ जून – जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील म्हैशाळ येथील एकाच कुटुंबातील ९ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याचे प्रकरण उघड झाले होते. या प्रकरणी अधिक अन्वेषण केले असता ही हत्या असल्याचे उघड झाले आहे. सोलापूर येथील तांत्रिक अब्बास महंमद अली बागवान आणि धीरज चंद्रकांत सुरवशे या दोघांनी या कुटुंबियांना जेवणात विष घालून ठार मारले आहे. या प्रकरणी बागवान आणि सुरवशे या दोघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
म्हैशाळ येथे २० जून या दिवशी एकाच कुटुंबातील ९ जणांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी एकूण २५ खासगी सावकरांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांपैकी १३ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.