हिंदुद्वेष्टे पत्रकार महंमद जुबेर यांना धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली अटक !
नवी देहली – ‘ऑल्ट न्यूज’ या राष्ट्रविरोधी वृत्तसंकेतस्ळाचे सहसंस्थापक महंमद जुबेर यांना देहली पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी अटक केली आहे. भा.द.वि. च्या ‘१५३ आ’ (दोन समुहांमध्ये शत्रुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करणे) आणि ‘२९५ आ’ (धार्मिक भावना दुखावणे) या कलमांखाली त्यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. वर्ष २०२० मधील एका प्रकरणानिमित्त २७ जून या दिवशी पोलिसांनी चौकशी करण्यासाठी त्यांना बोलावले होते. पर्याप्त पुरावे मिळाल्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली असल्याचे देहली पोलिसांनी सांगितले.
Journalist and Alt News co-founder Mohammad Zubair arrested by the Delhi Police today on charges of hurting religious sentiments under sections of the IPC 153/295 pic.twitter.com/ZseUCckPPK
— INDIA NARRATIVE (@india_narrative) June 27, 2022
महंमद जुबेर हे हिंदू, तसेच भारत यांच्याविरोधात देशातील मुसलमानांना भडकावण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. त्यांनी नुपूर शर्मा यांनी कथित रूपाने महंमद पैगंबर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यासंदर्भात दिशाभूल करणारा व्हिडिओ बनवला होता. तो व्हिडिओ पाहून भारतातील मुसलमान, तसेच किमान १५ मुसलमान देशांकडून शर्मा यांचा शिरच्छेद करण्याची, तसेच भारताने मुसलमान देशांची क्षमा मागावी, अशी मागणी करण्यात आली होती.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या विरोधात सातत्याने वातावरण बिघडवणार्या जुबेर यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी, असेच हिंदूंना वाटते ! |