जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) येथे शिवसैनिक आणि आमदार राजेंद्र पाटील यांच्या गटात झटापट !
जयसिंगपूर – जयसिंगपूर येथे एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेले अपक्ष आमदार आणि शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री झालेले राजेंद्र पाटील यांच्या कार्यालयासमोर शिवसैनिकांनी २७ जून या दिवशी निदर्शने केली. शिवसैनिकांनी कार्यालयासमोर पोलिसांनी लावलेले ‘बॅरिकेड्स’ तोडून कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. याच वेळी कार्यालयासमोर राजेंद्र पाटील यांचे समर्थकही आल्याने दोन्ही गटांत झटापट झाली. या वेळी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.