गुजरातमध्ये दर्ग्याचे मंदिरात कथित रूपांतर केल्याच्या विरोधात मुसलमान संघटनेकडून जनहित याचिका !
गुजरात उच्च न्यायालयाचा यथास्थितीचा आदेश देण्यास नकार
कर्णावती (गुजरात) – कर्णावतीजवळ असलेल्या पीर इमामशाह बाबा दर्ग्याचे हिंदु धार्मिक स्थळामध्ये कथित रूपांतर केल्याच्या प्रकरणी ‘सुन्नी अवामी फोरम’ या संघटनेने प्रविष्ट केलेल्या जनहित याचिकेवर यथास्थितीचा आदेश देण्यास गुजरात उच्च न्यायालयाने नकार दिला. मुख्य न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती मौना भट्ट यांनी राज्य सरकार, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, मामलेदार, पोलीस अधीक्षक आणि ‘इमामशाह बाबा रोजा ट्रस्ट’ यांना नोटिसा मात्र बजावल्या आहेत.
‘सुन्नी अवामी फोरम’ने याचिकेद्वारे ‘दर्गा आणि आसपासच्या मुसलमान धार्मिक स्थळांच्या नूतनीकरणाच्या नावाखाली इमामशाह बाबा रोजा ट्रस्टकडून ‘पूजास्थळ कायदा, १९९१’चे (‘प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्ट १९९१’चे) उल्लंघन करत हिंदु धार्मिक स्थळामध्ये रूपांतर केले जात आहे’, असा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार प्रविष्ट करण्यात आली होती; मात्र पोलीस कुठलीच कारवाई करत नाहीत, असा आरोपही याचिकेद्वारे करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंनो, मुसलमानांकडून शिका ! किती हिंदू आणि त्यांच्या संघटना त्यांच्या धार्मिक स्थळांच्या रूपांतराच्या विरोधात अशी तत्परता दाखवतात ? |