आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?
(भाग २१)
घराच्या भिंतींचा रंग आणि सजावट सात्त्विक असण्याचे महत्त्व !
४. वास्तूतील स्पंदनांविषयी आलेले अनुभव
४ आ. खोलीत काळ्या आणि पांढऱ्या रंगाने सर्व गृहसजावट केलेली असल्याने साधिकेच्या भावाला तीव्र शारीरिक अन् मानसिक त्रास होणे : ‘ऑस्ट्रियाची राजधानी असणाऱ्या व्हिएन्नामध्ये एक साधिका रहाते. तेव्हा त्यांना आलेली अनुभूती त्यांच्याच शब्दांत पाहूया. मागील वर्षी जेव्हा पू. तनुजा ठाकूर आमच्या घरी आल्या होत्या. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘घराच्या खोलीतील भिंती, चादरी, कपाटे काळ्या रंगाची असू नयेत.’’ माझ्या भावाने आमचा नकार असतांना खोलीत काळ्या आणि पांढऱ्या रंगाने सर्व गृहसजावट (इंटिरियर्स) करवून घेतली. जेव्हा पू. तनुजा ठाकूर युरोप दौऱ्याच्या वेळी आमच्या घरी काही दिवस थांबल्या होत्या, तेव्हा त्यांनी माझ्या भावाचे याविषयी प्रबोधन केले. माझ्या भावानेही त्यात पालट करणार असल्याची निश्चिती दिली. जेव्हापासून तो त्या खोलीत झोपायचा, तेव्हापासून तो चिडचिडा झाला होता. त्याला कंबरदुखीचा त्रास होऊ लागला. हे त्रास त्यालाही जाणवले.
४ इ. पू. तनुजा ठाकूर यांच्या वचनाच्या सत्यतेची प्रचीती येणे : पू. तनुजा ठाकूर आमच्या घरून गेल्यावर एकदा रात्री मी त्या खोलीत झोपायला गेले होते. तेव्हा मला रात्रभर निराशा वाटत होती. मनात भविष्याविषयी उलटे-सुलट विचार येत होते. यावरून माझ्या लक्षात आले, ‘पू. दीदींनी जे सांगितले होते, ते किती सत्य होते !’
– एक साधिका (वय २३ वर्षे), व्हिएन्ना, ऑस्ट्रिया (९.६.२०१५)
(समाप्त)
– पू. तनुजा ठाकूर, संस्थापिका, वैदिक उपासना पीठ (१०.२.२०२२)